या मुलांशी वागायचं तरी कसं?

सगळ्याच किशोरावस्थेतील मुलांच्या पालकांसमोर हा प्रश्न असतो.

अतिशय निरागस असलेल्या आपला मुलगा/ मुलगी, जो आपलं सगळं ऐकायचा हळुहळू आपलं ऐकेनासा होतो . सगळ्या गोष्टी जो आपल्याशी शेअर करायचा, तो आत्ता आईबाबांशी जास्त मनमोकळं बोलत नाही.

असा प्रश्न पडतो की, त्या आरश्यासमोर इतक्या वेळा का उभा राहतो ? त्याचा मूड सांभाळणं तर महाकठीण काम. कधी कोणती गोष्ट मनाला लावून घेईन, त्याचा नेम नाही. पालक म्हणून आपण काही सांगायला जावं तर आपल्याकडे बघतो असा की, “काय बावळटासारखं सांगताय?” आणि तेच मित्रांनी सांगितलेल्या सल्ला मात्र सर आखों पर !

आळशी तर इतका झालाय की 24 तास झोपायला सांगितलं तरी झोपेल असं पालकांना नेहमी जाणवतं.

किशोरावस्थेत मुलांमध्ये होणाऱ्या अशा अनेकविध बदलांमुळे पालक गोंधळून जातात आणि वयात येणाऱ्या या मुला-मुलींशी वागतांना पालकांच्या नाकी नऊ येतात, मात्र प्रश्न जरी जटिल वाटत असला तरी उत्तर मात्र सोपे आहे.

खालील दिलेल्या दहा मुद्द्यांकडे पालकांनी लक्ष दिल्यास “शिंग फुटलेल्या” या मुला-मुलीशी डिल करताना खटके कमी उडतील.

१. आहार :
किशोरावस्था हे वाढीचं वय असतं. मुलांच्या शरीराची वाढ अतिशय जोमाने होत असते. मुलांच्या आहारात योग्य प्रमाणास सकस घटकांचा म्हणजेच प्रथिने, कबोंदके, जीवनसत्त्वे इत्यादींचा अंतर्भाव असणे अतिशय आवश्यक आहे. योग्य आहाराचे दुष्परिणाम मुलांच्या शरीरस्वास्थ्याबरोबर मनस्वास्थायावरही होतात.

२. झोप :
आरोग्यासाठी झोपेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. किशोरावस्थेतमध्ये मुलांना सलग दहा तास झोप गरजेची आहे. पुरेशी झोप न घेणं /जागरण करणं, हे मुलामुलींमधील चिडचिड वाढण्याचं एक प्रमुख कारण आहे.

३. व्यायाम :
आजकालच्या स्पर्धेच्या युगात जो फीट असतो, तो यशस्वी होतो. बळकट शरीर मनस्वास्थ्यासाठी देखील आवश्यक आहे. नियमित व्यायाम किंवा मैदानी खेळ मुलांच्या बुद्धिमत्तेच्या विकासासाठी देखील मदत करतात. संशोधनाअंती हे सिद्ध झालेलं आहे की, नियमित व्यायाम किंवा मैदानी खेळ खेळल्याने मुलं जास्त सक्षमतेनं ताण-तणाव हाताळू शकतात.

४. शारीरिक व मानसिक बदलांबद्दल योग्य माहिती :
उत्सुकता, भिती, आनंद कधीकधी न्यूनगंड, अशा संमिश्र भावनांच्या चष्म्यातून मुलं त्यांच्यात होणाऱ्या शारीरिक व मानसिक बदलांकडे बघत असतात. लैंगिक आकर्षणामुळे तर ह्या गोंधळात आणखीनच भर पडते. पालकांनी जर अपेक्षित बदलांबद्दल मुलांना योग्य माहिती उपलब्ध करून दिली, तर मुलांना होणारे बद्दल स्विकारणे सोपे जाते. ही माहिती पालक स्वतः देऊ शकतात किंवा एखादा समजुतदार प्रौढ व्यक्ती जिच्यावर मुलांचा विश्वास आहे, ती हे काम करू शकते उदा. मामा, मावशी शेजारचे काका/ काकू किंवा फॅमिली डॉक्टर ( किशोरावस्थेतील मुलांच्या)इ.

५. सूचना :
मुलं आजकाल ऐकतच नाही अशी पालकांची बऱ्याचवेळा तक्रार असते. अशावेळेस पालकांनी सूचना देण्याच्या पद्धतीत जरा बदल केला तर खूप सकारात्मक बदल दिसून येतो एक उदाहरण पाहूया; परीक्षा जवळ आली आहे. सुमित ने अजूनही अभ्यासाला हात लावला नाही. सुमितच्या आईने, “अभ्यासाला बैस, अभ्यास कर” असे बऱ्याचवेळा म्हणून पाहिले पण सुमित काही मनावर घेत नाही. त्यामुळे आईची पण खूप चिडचिड होते. शेवटी आई सुमित ची तक्रार बाबांकडे करते. बाबा सुमितला म्हणतात ” सुमित, तुझ्यासारख्या हुशार आणि जबाबदार मुलाने अभ्यासाच्या बाबतीत अशी टंगळमंगळ करावी हे योग्य नाही. जर अभ्यासात काही अडचणी असतील तर मला सांग मी मदत करेन. चल एकत्र बसून अभ्यासाचं नियोजन करूया का?” बाबांच्या अशा सकारात्मक बोलण्यामुळे सुमित अभ्यासाला लगेच तयार झाला.

६. तुलना :
मुलांच्या लहानपणापासूनच पालकांकडून किंवा शिक्षकांकडून त्यांच्यात तुलना होऊ लागते. कधी ती तुलना वर्ग मित्रांशी होते तर कधी भावंडांशी. किशोरावस्थेतील मुलांना मात्र एखाद्या गोष्टीमध्ये त्यांची उणीव, कमीपणा दाखवणारी तुलना जिव्हारी लागते. पालकांचा उद्देश मुलांना प्रोत्साहित करणे असा असला तरी मुलांचा इगो दुखावल्यामुळे तो उद्देश सफल होत नाही. त्यामुळे पालकांनी इतर मुलांशी तुलना करणे टाळावे किंवा तुलना करावयाची असल्यास यांच्याशीच करावी. उदा; अदितीच्या अव्यवस्थित लिखाणाकडे बघून तिची आई म्हणते “आदिती, चौथीत असताना किती छान लिहायचीस तू , आता का असं अव्यवस्थित हस्ताक्षर काढतेस?”

७. निर्णय प्रक्रियेतील समावेश:
मोठं होणाऱ्या मुलांना कुटुंबामध्ये योग्य तो मान मिळाल्यास त्यांच्या आत्मप्रतिमेमध्ये खूपच सकारात्मक बदल दिसून येतात आणि हा मान देण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे घरातील प्रत्येक लहान मोठ्या निर्णयांमध्ये त्यांचे मत विचारणे. पाहुण्यांसाठी मेनू काय ठेवायचा पासून कोणत्या ब्रँडचा मोबाईल घ्यायचा किंवा कोणती कार घ्यायची अशा सगळ्या गोष्टींमध्ये घरातल्या मुलांचे मत विचारणे योग्य ठरते. त्यांचे मत पटत नसल्यास, ते का पटत नाही हे योग्य शब्दात मुलांना समजावून सांगावे. त्यामुळे मुलांना योग्य निर्णय सारासार विचार करून कसे घ्यावे हे समजते.

८. चुका करण्याची मुभा:
सुरवंटाचं फुलपाखरू होतांना थोड्याशा जखमा होणारचं. मुलांचेही तसंच असतं. प्रत्येक लहानसहान गोष्टीत त्यांना बरोबर करायचा किंवा वाचवायचा मोह पालकांनी टाळावा, थोडासा त्यांना धडपडू द्यावं, चुकू द्यावं. अनुभवातूनच मुलं शहाणी होतात आणि पालकांचा सल्ला जास्त पॉझिटिव्हली घ्यायला लागतात उदा; आठवीतला रोहन शिकवणीला निघाला होता. आभाळ भरून आलं होतं. आईने रोहनला छत्री नेण्यासाठी सांगितले पण रोहनला पटलं नाही .त्याला वाटलं पाऊस नाही येणार इतक्या लवकर. त्याने छत्री नाही नेले. आईनेही त्याला आग्रह केला नाही आणि शेवटी त्याला भिजतच यावं लागलं.

९. स्वतःवरील निर्बंध :
आपण मुलांसमोर कसं वागतो ह्याचं भान पालकांनी ठेवायलाच हवं. ‘कसं वागायचं आणि कसं नाही वागायचं ‘या दोन्ही गोष्टींसाठी मुलांसमोर पालकांचाच आदर्श असतो. वडील जर रोज दारू पित असतील तर मुलगाही दारू पिणार याची शक्यता खूप जास्त असते. किशोरावस्थेतील मुला-मुलींसमोर म्हणूनच पालकांनी खूप जबाबदारीने वागायला हवं. पालकांकडून काही चुकीचं वर्तन घडल्यास त्याबद्दल त्यांनी मोकळ्या मनाने चूक मान्य करावयास हवी.

१०. धोक्याच्या घंटा :
निराशयासारख्या काही मानसिक आजारांची सुरुवात किशोरावस्थेतच होत असते. त्यामुळेच पालकांनी जागरूक असणं गरजेचे आहे. खूप चिडचिड करणे, झोप न लागणे वाजवीपेक्षा जास्त टीव्ही, मोबाईलचा वापर करणे, व्यसन करणे किंवा आत्महत्येचा प्रयत्न करणे ह्या सर्व धोक्याच्या घंटा आहेत. त्याबद्दल पालकांनी वेळीच दखल घेतलेली आवश्यक असते.

कुमारवयात मुलं स्वतःचा शोध घेत असतात .
त्यांना पोषक वातावरण उपलब्ध करून देणे हे पालकांचे कर्तव्य आहे.

डाॅ. मयूर मुठे
मानसोपचार तज्ञ ,
मुठे हॉस्पिटल ,जळगाव.

Leave a Reply